---Advertisement---

Malegaon Bomb Blast Case : कुणाकुणाचा होता समावेश, कोण काय म्हणाले ?

---Advertisement---

---Advertisement---

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व ७ आरोपींना मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामध्ये भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. दरम्यान, निर्दोष मुक्त झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

निर्दोष मुक्त झाल्यानंतर कर्नल पुरोहित म्हणाले की, हा निकाल दिल्याबद्दल आभार मानतो, मी सैन्यासाठी काम करत आहे आणि करत राहीन. आमच्यासोबत जे काही घडले, मी कोणालाही दोष देत नाही. बऱ्याचदा अशा संस्था आणि तपास संस्था आजारी पडतात, त्यामध्ये भेसळ असते, या संस्था वाईट नसतात. पण, त्यांचे काही लोक वाईट असतात जे कायद्याचा गैरवापर करतात. देश मजबूत असला पाहिजे. पाया मजबूत असला पाहिजे.

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या की मी न्यायाच्या आदरामुळे आले आहे. मला १३ दिवस छळण्यात आले, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. १७ वर्षे माझा अपमान करण्यात आला. माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.

दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या निर्णयाला निराशाजनक म्हटले. तर काँग्रेस नेते कमलनाथ यांनी “ते खरे असो वा खोटे, न्यायालयाने निकाल दिला आहे, मग आपण अजूनही त्यावर चर्चा का करत आहोत?” असे म्हटले.

काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी – विनोद बंसल

विनोद बंसल (VHP प्रवक्ते) म्हणाले की काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, कारण काँग्रेसने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की १७ वर्षांच्या संघर्षानंतर आज सत्य बाहेर आले आहे. त्यांनी काँग्रेसवर ‘हिंदू दहशतवाद’चा खोटारडेपणा पसरवल्याचा आरोप केला आहे.

तसेच भाजप खासदार रवी किशन यांनी साध्वी प्रज्ञा यांचा उल्लेख करत म्हटले की, आज त्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत, पण त्यांना न्याय मिळाला आहे. त्यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करणाऱ्या नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.

न्यायालयाने काय म्हटले?


महत्त्वाचे पुरावे आणि पंचनामा व्यवस्थित झाला नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हट्ले आहे. याप्रकरणी भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह अनेकांवर आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---