नशिराबादमध्ये नगराध्यक्ष भाजपचा, उपनगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

---Advertisement---

 

सुनिल महाजन
नशिराबाद, प्रतिनिधी :
नशिराबाद नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मात्र, उपनगराध्यक्षांसह विविध ठरावांचे बहुमत त्यांच्याकडे नसल्याने सत्ताधारी नगराध्यक्षांसमोर कोंडी निर्माण झाली आहे. नशिराबाद नगरपरिषदेंतर्गत शहराचा विकास कसा होईल, असा प्रश्न शहरवासीयांसमोर उभा राहीला असून, उपनगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे लक्ष लागले आहे.

मंत्र्यांचाच बालेकिल्ल्यात शिंदेसेनेचा उदे उदे

नशिराबाद नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी युतीचे योगेश नारायण पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश नथ्थु चव्हाण यांना मात दिली. परंतु खरा पराभव हा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या स्व:ताच्याच जळगाव ग्रामीण मतदार संघातच झाला असल्याचा मतप्रवाह जनतेतून दिसून येत आहे.

अनेक डावपेचांचा सामना रंगणार

आगामी काळात अनेक राजकीय डावपेचांना सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील कोणाच्या खांद्यावरून निशाणा साधणार? व कोणते राजकीय डावपेच खेळणार, हे भविष्यात समजणे सध्या तरी अवघड आहे. त्यात आगामी काळात नगराध्यक्ष योगेश पाटील यांची भूमिका नेमकी काय असेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

युतीचे १४ तर एम.आय.एम २, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) २, अपक्ष २, असे सभागृहात २० नगरसेवक सदस्य संख्या आहे. त्यात शिंदे शिवसेना व भाजपा महायुतीच्या १४ आणि अपक्षांच्या आधार घेऊन नगरसेवक बहुमत महत्त्वाची ठरणार आहे.

सत्तासंघर्ष आणि अस्थिरतेचे वातावरण

नशिराबाद नगरपरिषदेत विकासात्मक वा विधायक कामातून मांडण्यात आलेले ठरावांच्या या निर्णय प्रक्रियेत अडथळे, राजकीय सत्तासंघर्ष आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता कायम राहिल्यास शहर परिसरात गांवाचा विकासात अडचणी निर्माण होतील, असा मतप्रवाह राजकीय धुरीणांकडून व्यक्त होत आहे.

उपनगराध्यक्षपद शिंदेसेनाकडे जाण्याची शक्यता!

नगरपरिषदेतील पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण अशा महत्त्वाच्या समित्यांवर नियंत्रण ठेवणे कारभारासाठी निर्णायक ठरते. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष असतात. उपनगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून होते. त्यामुळे नगराध्यक्ष एका पक्षाचा तर उपनगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा असे चित्र या नगरपरिषदेत दिसून येण्याची शक्यता आहे.

सत्तासंतुलन विरोधात झुकण्याची शक्यता

नगरपरिषदेत कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सभागृहात बहुमत असणे आवश्यक आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडे ते नसत्याने त्यांना कोणताही ठराव मंजूर करून घेणे आगामी काळात कठीण होणार आहे. वास्तविक, नगराध्यक्षांकडे बहुमत नसल्यास स्वीकृत नगरसेवकांची संख्या विरोधी गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नशिराबाद पालिकेतील सत्तासंतुलन नगराध्यक्षांच्या विरोधात झुकण्याची शक्यता दिसत आहे.

एकोप्याने व एकत्रीत काम करा

नगराध्यक्षा योगेश पाटील यांच्याकडे बहुमत सिद्ध करता येईल एवढे नगरसेवक नसल्याने प्रत्येक ठरावासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर दूसरी कडे शहरातील सत्तेचे व विरोधी पक्षाची निकालांचे संख्याबळ पाहता नांगरीकांनी शहराचा विकासासाठी एकोप्याने व एकत्रीत काम करण्याचा संदेश मतदानाद्वारे दिला असत्याची चर्चा होत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---