---Advertisement---
Team India Test Captain : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नवीन कसोटी कर्णधाराच्या नावाबाबतचे अनिश्चिततेचे ढग आता दूर होणार आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच नवीन कर्णधाराचे नाव जाहीर करणार आहेत.
आता प्रश्न असा आहे की भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा कधी होईल? तर ती तारीख २४ मे आहे. म्हणजेच शनिवारी भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराचे नाव जाहीर होईल. आतापर्यंत कर्णधारपदासाठी ज्या खेळाडूंची नावे चर्चेत आहेत, त्यात शुभमन गिलचे नाव सर्वात वर आहे. तसेच ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचाही विचार केला जात आहे.
नवीन कसोटी कर्णधाराबद्दल क्रिकेट जगतातील प्रत्येक तज्ञाचे स्वतःचे मत व्यक्त केले आहे. त्यात कोणी शुभमन गिल, तर कोणी बुमराहबद्दल त्यांचे हेतू व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, काही जणांनी ऋषभ पंतला संधी दिली पाहिजे, असे मत वक्त केले आहे. आता यावर पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. एकूणच संपूर्ण भारताला नवीन कसोटी कर्णधाराचे नाव कळेल, अशी तारीख निश्चित झाली आहे.
टीम इंडियाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात २० जूनपासून इंग्लंड दौऱ्याने होत आहे. भारताला इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि त्यासाठी संघ निवडण्यापूर्वी कर्णधाराचे नाव जाहीर करणे आवश्यक आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच नवीन कर्णधाराचे नाव जाहीर करणार आहेत.