शिवसेना कुणाची? पाकिस्तानातील लोकांना विचारलं तरी ते सांगतील – उद्धव ठाकरे

जळगाव : सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कुणाची याची प्रचीती येते, पाकिस्तानला जरी विचारलं शिवसेना कुणाची तरी तो सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिदू झालेल्या निवडणूक आयोगाला समजत नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली.

तसेच निवडणून गेलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत असून, ज्यांनी भगव्याला कलंक लावला त्यांचे हात कायमचे काढून टाकायचे आहेत असंही ते म्हणाले. पाचोरा येथील सभेत ते बोलत होते.

दरम्यान, या सभेपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळाले. सभेत घुसून दाखवा असे आव्‍हान दिल्‍यानंतर गुलाबराव पाटील यांचे समर्थक त्‍यांचा मुखवटा घालून पाचोरा गाठलं.  मात्र पोलिसांनी त्यांना रोखले, यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.