---Advertisement---

Holika Dahan 2025 : होळीच्या दिवशी का केला जातो पिठाच्या दिव्याचा उपाय? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

---Advertisement---

Holika Dahan 2025 : उद्या गुरुवारी (ता. १३ मार्च) रोजी होळी सण साजरा केला जाणार असून सर्वांना या सणाचे वेध लागले आहेत. विशेषतः यंदा तिथीप्रमाणे होळी सण साजरा होणार आहे. पण होलिका दहनाच्यावेळी पिठाचा दिवा का अर्पण केला जातो? तसेच विधी आणि महत्त्व काय आहेत, या संदर्भात जाणून घेऊया.

सुख, दुःखं प्रत्येकाच्या वाट्याला असतातच, पण जे आपल्याला हवं नसतं तेच लवकर आपली साथ सोडत नाही, अर्थात दुःखं. अशावेळी अनेकांना धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो. दरम्यान, ज्योतिषाने होळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असलेल्यांसाठी एक मार्ग सुचवला आहे. ज्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडू शकाल.

ज्योतिषानुसार, हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्व आहे. या दिवशी विधीवत पूजेसह काही अपाय केले जातात. त्यात पिठाच्या दिवाचा उपाय विशेष मानला जातो. या दिवशी पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केला जातो. मान्यतेनुसार असं केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते. यासह हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात.

असा करा ‘हा’ उपाय

होलिका दहनाच्या दिवशी रात्री पिठाचा पंचमुखी दिवा करावा. त्यात राईचे तेल भरावे. त्यात थोडे काळे तीळ, थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा. तसेच प्रार्थना करावी. प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये. घरी जावे. हात पाय धुवून निजावे, असे ज्योतिषाने म्हटले आहे.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त

यंदा तिथीप्रमाणे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त गुरुवारी (ता. १३ मार्च) रोजी रात्री ११.२६ ते दुपारी १२.३० पर्यंत असेल. तर १४ मार्च रोजी रंगांची होळी आहे.

(टीप : वरील माहिती केवळ धार्मिक मान्यतेनुसार आहे. ‘तरुण भारत लाईव्ह’ याची पुष्टी करत नाही)

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment