World Tribal Day 2025 : विश्व आदिवासी दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास

---Advertisement---

World Tribal Day 2025 : १९९३ साली झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ११व्या अधिवेशनात मूळनिवासी घोषणेला मान्यता मिळाली. १९९४ ला मूळनिवासी वर्ष आणि ९ ऑगस्ट ‘विश्व आदिवासी दिन’ म्हणून घोषित करण्यात आले. विश्व आदिवासी दिन शनिवारी (दि. ९ ऑगस्ट २ ०२५ ) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण या लेखात ”विश्व आदिवासी दिन” का साजरा केला जातो हे जाणून घेणार आहोत.

आदिवासी अस्तित्व, अस्मिता, रक्षण आणि संस्कृती, संवर्धनाचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे ”विश्व आदिवासी दिन”. या दिवशी अनेक मान्यवर ”आदिवासी अस्तित्व, अस्मिता, रक्षण आणि संस्कृती, संवर्धन” (जागृती करणे) यावर मार्गदर्शन करीत असतात. अर्थात घरी आलेल्या पाहुण्यांना करावयाचा अभिवादन आणि पाहुण्यांचा करावयाच्या आदर तिच्यात, जन्म, मरण विधी, सण, उत्सव, देवा देवतांच्या निसर्ग पूजा विधी, लग्न विधी आणि पंचाचा, न्याय निवाड्याच्या कारभारात आपल्याला आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते.

श्रम, समूह आणि सहकार्यावर आधारित आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, वेशभषा राहणीमान, खाणंपिणं, रिती रिवाज आणि परंपरा हे आदिवासी जीवनाचे सौंदर्य आहे. ते जपले पाहिजे, एवढंच नाही तर घरी आलेल्या पाहुण्यांना करावयाचा अभिवादन हारो हाय का? हाजाज के? वार्तास के? मज्यामां कं? इत्यादी आपले अभिवादन आपण विसरत आहोत.

जन्म-मृत्यूच्या व्यवहारात सुख दुःखाच्या भावना सहकार्याची परंपरा, निसर्ग-देवी देवतांची पूजा विधी आणि त्याची पूजा विधीतील अध्यात्म भाव आणि त्याची आचारसंहिता सण उत्सवातील आनंद न्याय निवाडा या परंपरेतील लोकशाही हिच मानवता आहे.

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी संस्कृती रक्षणासाठी भजनी मंडळांना साहित्य-संच दिली जात आहे. ही भजनी मंडळी कोणत्या संस्कृतीचे रक्षण करीत आहेत हे त्या शासनालाच माहिती आणि दूसरे असे बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून त्या आदिवासी तरुणांना बॅण्ड बाजा व्यक्तिगत पातळीवर देत आहे. त्यांना रोजगार मिळाला खरा, पण आदिवासींची सहकार्यावर आधारित संस्कृती नष्ट होते. बॅण्ड बाजा, डीजेची संस्कृती महागडी आहेच ही संस्कृती व्यक्ती वर्चस्व आणि दाखवणारी आहे.

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी संस्कृती जपणारा ढोल, आणि त्याचा पूर्ण संच ढोल, पावरी, बासुरी, तूर, थाळी, मांदल, नूतङधा-पेपान्या आदी संच गावच्या सामूहिक मालकीने दिला पाहिजे, बोल आणि प्रत्येक वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण आदिवासी विकास विभागामार्फत दिला पाहिजे, आदिवासी संस्कृतीचे वाहक आदिवासीत लग्न लावणारा प्रधान तसेच पुजारा आणि गिताऱ्यांना आदिवासी विकास विभागाकडून दर माह पाच हजार मानधन मिळायला पाहिजे.

अश्या मागण्या या दिवशी केल्या जातात. एकूणच काय तर आदिवासी अस्तित्व, अस्मिता, रक्षण आणि संस्कृती, संवर्धनाचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे विश्व आदिवासी दिन…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---