---Advertisement---
Poojashree Suicide : पतीच्या अनैतिक संबंधांना व छळाला कंटाळून एका २८ वर्षीय महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजाश्री असे मृत महिलेचे नाव असून, तिला पतीच्या प्रेमसंबंधांबद्दल समजले होते. ”अहो, असं नका करू…” असे सांगून तिने अनेकवेळा त्याला समजवायचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याचे कारनामे चालूच ठेवल्याने पूजाश्री हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, मृत महिलेचे तीन वर्षांपूर्वी तिच्या पालकांच्या संमतीने नंदीश नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते. पूजाश्री एका बँकेत कॅशियर म्हणून, तर पती नंदेश हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. दोघांना एक मुलगी देखील आहे.
काही महिन्यांपूर्वी पूजाश्रीला कळले की तिच्या पतीचे एका महिलेसोबत एक वर्षापासून अनैतिक संबंध आहे. तिने याबद्दल पती नंदीशला विचारले असता, त्याने धमकी दिली व तिचा छळ करू लागला. तसेच सासूने देखील हुंड्यासाठी पूजाश्रीचा छळ सुरु केला.
या सर्व प्रकारानंतर, पूजाश्री माहेरी निघून गेली. त्यानंतर पती पूजाश्रीला त्याच्या घरी घेऊन गेला आणि पुन्हा कधीही हुंड्यासाठी छळ करणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, तीन दिवसांपासून त्याने पुन्हा भांडणे सुरू केली आणि पत्नी पूजाश्रीला त्रास देऊ लागला.
यानंतर पूजा पुन्हा माहेरी गेली. तो पुन्हा तिच्या माहेरी पोहोचला आणि तिला सोबत घेऊन गेला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजाश्रीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
दरम्यान, पतीच्या अनैतिक संबंधांना व छळाला कंटाळून पूजाश्रीने आत्महत्या केल्याचा आरोपी कुटुंबीयांनी केला असून, याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, याचा पुढील पोलीस करत आहेत.