---Advertisement---
Crime News : दिरासोबत असलेल्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहितेला तिच्या चुलत दिरासोबत लग्न करायचे होते, यामुळे तिने हे पाऊल उचलले. महिलेने पतीची हत्या केल्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
बिहारच्या बख्तियारपूरमध्ये ही घटना घडली असून, शालू असे आरोपी महिलेचे नाव आहे. शालूचा पती धीरज हा अपंग होता. शालू तिच्या चुलत दिराच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघेही एकमेकांवर प्रेमाच्या बुडाले. शालूला त्याच्यासोबत लग्न करायचे होते, मात्र पती धीरज अडसर ठरत होता. यामुळे शालूने हे पाऊल उचलले.
अन् केला गोळीबार
पोलिसांनुसार, मृताची पत्नी आणि तिच्या चुलत दिराने मिळून कट रचला होता. दोघांनीही धीरजला घरापासून दूर असलेल्या पुलावर बोलावले आणि गोळीबार करून त्याची हत्या केली. दोघांनीही मृतदेह नदीत फेकून दिला. मात्र, पती बेपत्ता झाल्यानंतरही पत्नीच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती, ती सामान्य दिवसांसारखी राहत होती. पोलिसांना पत्नीच्या वागण्यावर संशय आला आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली असता हे प्रकरण उघड झाले.
पत्नीला केली अटक
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात ही घटना घडवून आणण्यात एकूण ५ जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. सध्या मृताची पत्नी शालूला अटक करण्यात येत आहे, तर उर्वरित आरोपी फरार आहेत. इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत.