---Advertisement---

Sangli Murder News : सांगली हादरले! इन्शुरन्सचे पैसे मिळावे म्हणून पत्नीनेच संपवले पतीला

---Advertisement---

Sangli Murder News : आपले भविष्य सुरक्षित राहावे यासाठी अनेक जण विमा पॉलिसीचा आधार घेत असतात. विमाच्या माध्यमातून भविष्य व कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न असतो. परंतु हीच विम्याची रक्कम जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार सांगतील समोर आला आहे. विम्याची रक्कम मिळावी म्हणून या ठिकाणी चक्क पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणीआरोपी पत्नीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावात ही घटना घडली असून, बाबूराव पाटील असे मयताचे नाव आहे. घर बांधकामासाठी काढलेलं कर्ज, खाजगी माणसांकडून घेतलेले उसनवार पैसे, भागवण्याच्या कारणातून बाबुराव पाटील यांच्या नावे असलेल्या इन्शुरन्सचे पैसे मिळावे, यासाठी पत्नी व मुलाने बाबुराव पाटील यांची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, सुरुवातीला या घटनेत अपघाताचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करत खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे.

नेमकी घटना काय?
कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज ते पंढरपूर रस्त्यावर १० फेब्रुवारी रोजी शिरढोण येथील बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासवले होते. बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील याने घटनास्थळावरुन मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातअपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत होते.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मुलगा तेजसला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भिमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील यांचा आर्या हॉटेलजवळ रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment