---Advertisement---
Extramarital affair : पती पत्नीचं नातं हे सर्वात पवित्र मानलं जातं. मात्र, या नात्याला छेद देणारा एक क्रूर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आता नेमका कुणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर पत्नी पोलीस ठाण्यात देखील ढसाढसा रडली. मात्र आता गुपित उघडताच सर्वच हादरले आहे.
पोलीस सूत्रानुसार, विनोद भगत (५२) यांचे प्रियंका नामक महिलेशी २००३ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्यही आहेत. विनोद यांच्या मालकीचे आरसीसीचे घर होते. हे घर पत्नी प्रियंकाने तिच्या ओळखीतल्या शेख रफीक शेख रशीद याच्या मदतीने ३० लाखाला विकले. यानंतर पैशाच्या कारणावरून पती पत्नीत वाद होत असे.
दरम्यान, शेख रफीक याने प्रियंकाशी जवळीक साधली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याची माहिती विनोद यांना मिळाली होती. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. यामुळे पती विनोदचा काटा काढण्याचा निर्णय पत्नी प्रियंका आणि तिच्या प्रियकराने घेतला.
दोघानी मिळून कट रचला. प्रियकर शेख रफिक याने विनोदला घेऊन पैनगंगा येथील खरबी पुलावर पोहचला. त्यानंतर त्याने विनोदला दारू पाजवली आणि पुलावरून नदीत फेकून दिले.
घटनेनंतर पत्नी प्रियंका पोलीस ठाण्यात पोहोचली आणि ढसाढसा रडून आपला पती बेपत्ता असल्याचा बनाव केला. पोलिसांनी तक्रार दाखल करत विनोद भगत याचा तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांना पैंनगंगा नदीत त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे मृत विनोदच्या बहिणीने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी फोन कॉल तपासले असतात मयताच्या पत्नीच्या मोबाईलवरून आरोपी रफिक सोबत नेहमी संवाद होत होता. कॉल रेकॉर्डींगमुळे खुनाच्या दीड महिन्यांनी हा उलगडा झाला आहे.
नांदेडच्या किनवटयामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेनंतर आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून दोघांनाही अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.