”मरेपर्यंत मार”, म्हणत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, नंतर…


मुंबई : पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आरे पोलीस ठाण्याच्या छोटा काश्मीर गार्डन परिसरातून हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरे पोलिसांनी पत्नी राजश्री आणि तिच्या प्रियकराचा भाऊ रंगा याला अटक केली आहे, तर प्रियकर चंद्रशेखर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रानुसार, मृत भरत अहिरे (४०) हा फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचा. राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर आरे कॉलनी परिसरात एक तबेला चालवतो. भरतच्या आईच्या म्हणण्यानुसार, भरतची पत्नी राजश्री आणि चंद्रशेखरचे एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. भरतने विरोध केल्यानंतर, राजश्रीने भरतला सांगितले की तिने चंद्रशेखरला तिच्या मोबाईलवरून ब्लॉक केले आहे, मात्र नंतर कळले की राजश्रीने पूजाच्या नावाने प्रियकर चंद्रशेखरचा मोबाईल नंबर सेव्ह केला होता.

त्याला मरेपर्यंत मार…

राजश्रीच्या फोनवर प्रियकर चंद्रशेखरचा फोन आला, तेव्हा भरतचे त्याच्याशी या गोष्टीवरून भांडण झाले. त्यावेळी भरतची मोठी मुलगी आणि दोन्ही लहान मुले घरात होते. भांडणानंतर पत्नी राजश्रीने तिच्या प्रियकराला फोन करून सांगितले की ”तू त्याला एवढी मारहाण करत की तो मरेल किंवा एक वर्ष अंथरुणावर पडून राहील.”

मुलीने उघड केली घटना

घटनास्थळी असलेली भरतची मुलगी श्रेया हिने पोलिसांना सांगितले की, आईने चंद्रशेखरला फोन केला, तेव्हा आईने वडिलांनासोबत घेतले आणि बाहेर शौचालयाजवळ गेली. चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांनी मिळून माझ्या वडिलांना लाथा आणि ठोस्यांनी मारहाण केली. त्यांना इतकी मारहाण केली की वडिलांच्या पोटातील नस फुटली. छातीची हाडे तुटली. त्यावेळी माझी आई जवळच उभी होती आणि आणखी मारहाण करायला सांगत होती. मी काही अंतरावर उभी होते. जेव्हा मी ऐकले की माझी आई वडिलांना खूप मारहाण करायला सांगत आहे, तेव्हा मी घाबरले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---