संशयाचे भूत मानगुटीवर ; पत्नीजवळ गेला अन्…, घटनेनं हळहळ

---Advertisement---

 

धुळे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुन्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
साक्रीच्या उमरपाटा गावात ही घटना घडली असून, आरोपी पतीला पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे.

वेचीबाई किसन बिलकुळे (वय ४२) असे मृत विवाहितेचे, तर किसन दाव्या बिलकुळे (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव आहे. उमरपाटा येथील पांढरीमाता शिवारात असलेल्या शेतामधील त्यांच्या घरात हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन याने पत्नी वेचीबाईच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने घरात असलेली कुन्हाड घेऊन पत्नीच्या डोक्यात आणि कपाळावर वार केले.

यात गंभीर जखमी झालेल्या वेचीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या दाम्पत्याचा मुलगा, सुभाष किसन बिलकुळे (वय २४) याने पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी किसन बिलकुळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---