संशय आला अन् दार उघडलं, वहिनीला भयावह स्थितीत पाहून चिरकली नणंद; नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

Wife murder : पती-पत्नीचं नातं हे पवित्र मानलं जातं, मात्र या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्थात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने क्रूर कृत्य केलं.

दरम्यान, नणंदेला संशय आल्यामुळे तिने दरवाजा उघडून पाहिला असता, ही घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रानुसार, चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. शीतल असे मृत महिलेचे, तर नितीन असे आरोपी पतीचे नाव असून, घटनेच्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे.

मात्र, पत्नीची हत्या केल्यानंतर नितीन हा दार बंद करून घटनास्थळावरून पळून गेला. रात्री उशिरा नणंदला संशय आल्यामुळे तिने दरवाजा उघडून पाहिला असता, ही घटना उघडकीस आली.

नाशिकच्या पंचवटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, अधिक तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दारूच्या नशेत नितीनने शीतलला मारहाण केली आणि नंतर दोरीने गळा दाबून तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---