---Advertisement---
Extramarital affair : दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीहून गावी परतलेल्या मुकेशला पत्नीचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचे कळाले. यामुळे दोघांमध्ये दररोज वाद होत होते. दरम्यान, शनिवारी रात्री हा वाद टोकाला जाऊन भयंकर घटना घडली. मुकेश (२८), त्याची पत्नी गुडिया (२६ वर्ष) असे दोघांचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, मुकेश हा कामानिमित्त दिल्लीमध्ये राहत होता. तो दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीहून आपल्या गावी परतला होता. यावेळी त्याची पत्नी गुडिया हिचे शेजारच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. यामुळे दोघांमध्ये दररोज वाद होत होते.
ग्रामस्थांच्या मते, गुडिया आणि तिच्या शेजारच्या एका तरुणाचे नाते गावात बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय होता. दिल्लीहून परतल्यानंतर मुकेशला हे कळले, ज्यामुळे तो मानसिक त्रासात होता. दोघांमध्ये दररोज वाद होत होते.
दरम्यान, शनिवारी रात्री हा वाद टोकाला जाऊन भयंकर घटना घडली. झालं असं की मुकेशने रागाच्या भरात प्रथम पत्नी गुडियाची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मुकेश आणि पत्नी गुडिया या दोघांना तीन लहान मुली असून, मात्र त्या अनाथ झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाबाबत, स्टेशन हाऊस ऑफिसर हनुमान प्रताप सिंह सूर्यवंशी यांनी सांगितले की, घटनेची चौकशी केली जात आहे.
घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त करण्यात आली असून, शेजारच्या तरुणाची चौकशी केली जाणार आहे. कुटुंबाचे जबाब देखील नोंदवले जात असून, पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.