मोठी उलथापालथ! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. अमोल कोल्हे आज दि. ४ जुलै रोजी शरद पवार यांच्याकडे राजीनामा सोपविणार आहेत.

अमोल कोल्हे यांनी ३ जुलै रोजी एक सूचक ट्विट केलं होतं. जेव्हा हृदय आणि डोक्यात युद्ध सुरू असेल तर हृदयाचं ऐका. डोकं कधी कधी नैतिकता विसरण्याची शक्यता असते. पण हृदय नैतिकतेला कधीच मूठमाती देत नाही, असं म्हणत मी साहेबांसोबतच आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले होते.

तसेच, अमोल कोल्हे यांनी ३ जुलै रोजी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच मी तुमच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच खासदारकीबाबत निर्णय घेणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यावर मी उद्या मुंबईत आहे. उद्या या बोलू. तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी त्यांना दिला होता. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी माहिती आहे.