---Advertisement---

पुढील हंगामात काय करणार ? वैभव सूर्यवंशीने सांगून टाकलं

---Advertisement---

Vaibhav Suryavanshi : पुढील इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२६) माझ्या संघासाठी दुप्पट चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करेन, असे पदार्पणाच्या हंगामातच अमिट छाप सोडणारा राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने सांगितले.

एप्रिलमध्ये जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यवंशीने केवळ ३८ चेंडूत ७चौकार व ११ षट्‌कारांसह १०१ धावा ठोकून चेंडूंचा सामना करताना (३५) कोणत्याही भारतीयासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला.

या झंझावाती खेळीमुळे सूर्यवंशीने केवळ आयपीएलमधील दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम नोंदवला नाही तर तो १४ वर्षे आणि ३२ दिवसांत पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात तरुण टी-२० शतकवीरही ठरला.

आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येकासाठी स्वप्नासारखे असते आणि माझ्या पहिल्या हंगामातून मला खूप सकारात्मक गोष्टी मिळाल्या आणि पुढच्या हंगामात मी संघासाठी काय करू शकतो याबद्दल मी बरेच काही शिकलो,” असे सूर्यवंशी म्हणाला. शुभमन सूर्यवंशीला आयपीएल सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कार देण्यात आला.

मी ज्या क्षेत्रांमध्ये चुका केल्या त्या क्षेत्रांवर मी काम करेन आणि पुढच्या वर्षी संघासाठी बरेच चांगले करण्याचा प्रयत्न करेन, असे तो म्हणाला. या कामगिरीमुळे सूर्यवंशीला मुंबईच्या आयुष म्हात्रेसह इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान देण्यात आले.

म्हात्रेने चेन्नई सुपर किंग्जसाठी यशस्वी पदार्पण केले. ‘ही एक नवीन स्पर्धा आहे. मी पहिल्यांदाच इंग्लंडला जात आहे म्हणून हा एक नवीन अनुभव असेल. तिथे खेळ कसा चालतो हे मी अनुभवेन, असे सूर्यवंशी म्हणाला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment