संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत सोमवारी सुद्धा विरोधी पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी आणखी 33 खासदारांना निलंबित केले आहे.
सभागृहात सतत गदारोळ करणे आणि खुर्चीचे पालन न केल्याने खासदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारीही सभापतींनी विरोधी पक्षाच्या १३ खासदारांना निलंबित केले होते.
दरम्यान, संसदेतील जवळपास ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत हे निलंबन कायम असणार आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात त्यांना भाग घेता येणार नाही. याप्रकरणी निलंबित खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. पुढील रणनीती या बैठकीत ठरवली जाईल.