मुंबई : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात आज, सोमवारी पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा सामना गत विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) होणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीलाच दोन जबरदस्त हादरे बसल्यानंतर आता मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर केकेआरविरुद्ध खेळताना जोरदार मुसंडी मारण्याची आशा आहे.
आयपीएल हंगामाची सुरुवात सलग पराभवाने होणे मुंबई इंडियन्ससाठी नवीन नाही. यापूर्वीही मुंबई इंडियन्सने अशा सलग पराभवाचा सामना कलेला आहे. या हंगामात मुंबईने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्सकडून दोन सामने गमावले आहेत. ते अद्याप खाते उघडू शकले नाहीत.
मुंबई इंडियन्सला पुन्हा आयपीएल चषक जिंकायची असेल, तर त्यांना एकजुटीने सांघिक कामगिरी करण्याची गरज आहे. त्यांच्या गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची तसेच फलंदाजांकडून सातत्य आवश्यक आहे. विशेषतः तळाच्या फळीत एखादा विशेषज्ञ फिनिशर असणे आवश्यक आहे. रोहित शर्मा थंड खेळ करत आहे, तर रायन रिकल्टनला भारतीय खेळपट्ट्यांवर अद्याप त्याची लय सापडलेली नाही.
रोहित दोन वेळा एकाच अंकात बाद झाला, ज्यामध्ये शून्य धावांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवने गुजरातविरुद्ध ४८ धावा करून आपण फॉर्ममध्ये परींशयाचे दाखवून दिले. सातत्याने संघात बदल केल्यामुळे मुंबई इंडियन्स अजूनही योग्य संघ बांधणीच्या शोधात आहे. मुंबईला सूर्यकुमार व तिलक वर्माकडून खूप आशा आहे.
कर्णधार हार्दिक पांड्या वानखेडे स्टेडियमवर चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. गत वर्षी रोहितकडून मुंबई इंडियन्स संघाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याला प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची जबाबदारी ट्रेंट बोल्ट रीस टॉपल व दीपक चहर यांच्यावर अवलंबून आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्सवर विजय मिळविला. या विजयामुळे केकेआर संघाचे मनोबल उंचावलेले असेल. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआरकडे आवश्यक असलेली ताकद आहे, परंतु क्विंटन डी कॉकचा सलामीचा जोडीदार म्हणून सुनील नारायण नसल्यामुळे सलामीवीर म्हणून मोईन अली खेळण्याची शक्यता आहे. त्यांच्या फलंदाजी क्रमवारीत रहाणे, व्यंकटेश अय्यर व अंगकृष्ण रघुवंशीचा समावेश आहे.
रिंकू सिंग व आंद्रे रसेल यांच्यामुळे केकेआरकडे डेथ ओव्हर्समध्ये आक्रमक कामगिरी अशा आहे तर त्यांची गोलंदाजीही तितकीच प्रभावी आहे. हर्षित राणा व वैभव अरोरा हे ऑस्ट्रेलियन डावखुरा गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन यांच्यासह नवीन चेंडूवर प्रभावी आक्रमण करतात, परंतु केकेआरची खरी ताकद त्यांच्या फिरकी हल्ल्यात आहे. या फिरकी आक्रमणांत सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती आहेत व त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला धक्का देण्याची श्रक्ष मता आहे.
सुनील नरेनचे आजारातून बरे होण्याचे संकेत
सुनील नरेनने शनिवारी येथे सराव केला व त्याने आजारातून बरे होण्याचे संकेत दिले आहे. त्याच्या संभाव्य पुनरागमनामुळे केकेआर उत्साहित असेल. गत वर्षी केकेआरने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळविला होता व १२ वर्षांत वानखेडे स्टेडियमवर त्यांचा हा पहिलाच विजय होता. हे मैदान अलिकडच्या काळात पाच वेळा विजेत्यांसाठी बालकिल्ला राहिला नाही.