---Advertisement---

Shreyas Iyer : अर्ध्या रात्री फोन अन् केलं संधीचं सोनं; पण दुसऱ्या वनडेत स्थान कायम राहणार का?

---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रभावी विजय मिळवला. या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आणि त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अय्यरने केवळ 36 चेंडूत 59 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 2 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. भारतीय संघाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिला. मात्र, सामन्यानंतर अय्यरने एक मोठा खुलासा केला, ज्यामुळे क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे.

सामन्यानंतर श्रेयस अय्यरने सांगितलं की, नागपूर वनडेत त्याला संघात स्थान मिळणं कठीण होतं. मात्र, विराट कोहली अनफिट असल्यामुळे त्याला संधी मिळाली. अय्यर म्हणाला, “मी सामन्याच्या आधी एका चित्रपटाचा आनंद घेत होतो. मी विचार केला की थोडा आणखी वेळ चित्रपट पाहतो. पण अचानक कर्णधार रोहित शर्माचा कॉल आला. त्याने मला सांगितलं की, कदाचित तू खेळू शकतोस, कारण विराट कोहलीचा गुडघ्याला सूज आली आहे. हे ऐकताच मी पटकन उठलो आणि लगेच झोपलो, जेणेकरून मी ताजातवाना राहू शकेन.”

हेही वाचा : अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक

श्रेयस अय्यरने प्रभावी खेळी केली असली, तरी तो टीम इंडियाच्या ‘प्लान ए’ चा भाग नसल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच, जेव्हा संपूर्ण संघ उपलब्ध असेल, तेव्हा त्याला पहिल्या पसंतीत स्थान मिळेल की नाही, हा प्रश्न आहे. कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेसाठी विराट कोहलीच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्यामुळे अय्यरला प्लेइंग 11 मध्ये कायम ठेवणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जर विराट कोहली दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असेल, तर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल निश्चित होतील. काही क्रीडाप्रेमी असा अंदाज लावत आहेत की, यशस्वी जयस्वालला विश्रांती देऊन शुभमन गिलला ओपनिंगला पाठवले जाऊ शकते. तसेच, कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळायला उतरला, तर अय्यरची जागा संघात राहू शकेल. पण जर व्यवस्थापनाने ‘प्लान बी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, तर अय्यरला आणखी एक संधी मिळू शकते.

अय्यरच्या कामगिरीकडे लक्ष

श्रेयस अय्यरने संधी मिळताच चांगली खेळी करत स्वतःचं महत्त्व सिद्ध केलं आहे. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन योजनांमध्ये त्याचा समावेश कितपत असेल, हे आगामी सामन्यांवर अवलंबून असेल. दुसऱ्या वनडेसाठी कोहलीच्या उपलब्धतेवरूनच अंतिम निर्णय होईल. कटक वनडेसाठी भारतीय संघ कोणत्या संयोजनासोबत मैदानावर उतरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment