---Advertisement---

Mahavikas Aghadi : विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटणार ?

---Advertisement---

Mahavikas Aghadi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर उभी राहिली आहे. अर्थात  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची आवश्यकता काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाऊ लागली आहे.

शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी पक्षाने भविष्यातील निवडणुका एकट्याने लढवायला हव्यात, असे कार्यकर्त्यांच्या एका वर्गाचे मत असल्याचे सांगतिले.

दानवे यांच्या वक्तव्यानंतर मित्रपक्ष काँग्रेसच्या एका नेत्यानेही शिवसेनेप्रमाणेच (उबाठा) त्यांच्या कार्यकर्त्यांनाही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

मात्र, याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवाय निवडणुकीच्या पराभवानंतर या तिन्ही पक्षांनी एकत्रित येत कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नसल्याने आघाडीत विसंवादाला सुरुवात झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment