छगन भुजबळांसह हे आमदार अजित दादांना सोडणार ? रोहित पवार यांचा दावा

अजित पवार गटनेते छगन भुजबळ हे पक्षावर नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे. या सगळ्या चर्चेदरम्यान  आमदार रोहित पवार यांचे एक वक्तव्य समोर आले आहे.

काय म्हणाले रोहित पवार ? 

गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिकात्मक विधान केले आहे. मी अजित पवार यांच्यासोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे छगन भुजबळ म्हणाले होते. छगन भुजबळ हे अनुभवी नेते आहेत आणि त्यांना काहीतरी अंदाज आला असेल. त्यामुळेच त्यांनी असे विधान केले असावे. छगन भुजबळच नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडणार आहेत , असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार असून ते १२ जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात आमदार पक्ष बदलू शकतात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये होणारे पावसाळी अधिवेशन हे विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन मानले जाते.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाला फायदा होतो आणि महायुतीमध्ये चलबिचल होते, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले होते. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महायुतीतील सर्व नेते आपापलाच विचार करत आहेत. जनतेचं यांना काही पडलेलं नाही. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील आमदारांना भीती वाटायला लागली आहे. आता आपलं काय होणार? असं त्यांना वाटतंय. म्हणून पराभवाचं खापर कुणाच्या माथी फोडायचं, तर कधी भुजबळ साहेबांचे नाव घ्यायचे तर कधी अजित पवारांचं नाव घ्यायचं सुरू आहे, असा रोहित पवार यांनी केला.