---Advertisement---

रोहित शर्माची जागा घेणार आयपीएलचा ‘हा’ स्टार फलंदाज? इंग्लंड कसोटीत माजवू शकतो खळबळ

---Advertisement---

Team India Cricket Team : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर विराट कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेण्याची ईच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली आहे. तथापि, बीसीसीआयने विराटला त्याच्या निवृत्तीचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. दरम्यान, भारताच्या कसोटी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जागा कोण घेईल ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

टीम इंडियाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा असून, येथे त्यांना पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनपासून खेळला जाईल. रोहितने आधीच निवृत्ती घेतली आहे. आता जर विराटनेही कसोटीतून निवृत्ती जाहीर केली तर या दोन दिग्गजांची जागा कोण घेईल, हे जाणून घेऊया.

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत युवा फलंदाज साई सुदर्शन माजी कर्णधार रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. साई सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे. सुदर्शनच्या बॅटने आयपीएल २०२५ च्या ११ सामन्यांमध्ये ५०९ धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपपेक्षा फक्त दोन धावांनी मागे आहे. ऑरेंज कॅप सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. सूर्याने ५१० धावा केल्या आहेत. साई सुदर्शनने भारतासाठी ३ एकदिवसीय आणि एक टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. सुदर्शनने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावलीय.

हा अनुभवी खेळाडू घेऊ शकतो विराटची जागा

भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. अय्यरही उत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२५ मध्ये अय्यरच्या बॅटने आतापर्यंत ४०५ धावा केल्या आहेत. अय्यरने भारतासाठी ७० एकदिवसीय, ५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि १४ कसोटी सामने खेळले आहेत. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर उत्तम कामगिरी करतो. आता त्याला कसोटी सामन्यांमध्येही या पदावर खेळवता येईल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment