विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी तिरुची शिवा यांना मिळणार संधी ?

---Advertisement---

 

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. मात्र, यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते एकत्रित बैठकीत हे ठरवतील. मी याबद्दल काहीही सांगू शकत नाही.

अरविंद सावंत यांना तुम्ही (विरोधी पक्ष) लोकांनीही कोणतेही नाव ठरवले आहे का ? असे विचारले असता त्यांनी उत्तर देतांना सांगितले की, ते अद्याप माहित नाही. आमचे विरोधी पक्ष नेते एकत्र बसून चर्चा करतील. उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. नवीन उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ जगदीप धनखड यांच्या उर्वरित कार्यकाळापर्यंत राहणार आहे.

तिरुची शिवा कोण आहेत?

तिरुची शिवा हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते द्रमुक पक्षाचे आहेत आणि ते देखील तामिळनाडूचे आहेत. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे देखील तामिळनाडूचे आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून तिरुची शिवा यांच्या नावाबाबत चर्चा होतांना दिसून येत आहे.

तिरुची शिवा १९९६ मध्ये पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य झाले. ते जानेवारी २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. यानंतर जुलै २००७ मध्ये पुन्हा राज्यसभेचे खासदार झाले, २०१४ मध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर ते निवडून आले. एप्रिल २०२० मध्ये चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून आले आहेत.

शिवा यांनी एमए (इंग्रजी), बीएल पेरियार ईव्हीआर कॉलेज, मद्रास विद्यापीठ आणि तिरुची लॉ कॉलेज, भारतीदासन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---