एका महिलेनं पतीला नाश्ता आणायला पाठवून, मुलांच्या समोरच प्रियकरासोबत पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने रेल्वे स्टेशनवर पतीला भूक लागल्याचे सांगत नाश्ता आणायला पाठवले.
पती नाश्ता घेऊन परत आल्यानंतर, त्याला मुलांनी सांगितले की, आई एका अनोळखी काकासोबत पळून गेली आहे. हे ऐकून हतबल झालेल्या पतीने तातडीने पत्नीचा शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही. शेवटी पतीने आपल्या मुलांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात पतीने सांगितले की, 12 वर्षांपूर्वी हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही वर्षांपर्यंत सर्व काही सुरळीत होते. पती गुजरातमधील खासगी कंपनीत काम करत होता, तर पत्नीनेही नोकरी करण्याचा आग्रह धरला आणि नोकरी मिळवली. मात्र, नोकरीनंतर तिच्या वागण्यात बदल होऊ लागला.
रेल्वे स्टेशनवरील थरार
हा धक्कादायक प्रकार सुलतानगंज रेल्वे स्टेशनवर घडला. घटनेच्या दिवशी, कुटुंब सुलतानगंज रेल्वे स्टेशनवर सबूर गावाकडे जाण्यासाठी आले होते. स्टेशनवर भूक लागल्याचे कारण देऊन पत्नीने नाश्ता मागवला. पती नाश्ता आणायला गेल्यावर ती प्रियकरासोबत पळून गेली.
मुलांनी केला खुलासा
पती नाश्ता घेऊन परतल्यावर मुलांनी सांगितले की, आई एका काकासोबत पळून गेली आहे. या खुलाशानंतर पतीने आपल्या मुलांसह पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस तपास सुरू
आई एका अनोळखी काकासोबत पळून गेल्याचे मुलांनी सांगितल्यानंतर पतीने पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.