---Advertisement---

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, प्रसिद्ध उद्योजकावर महिलेचा गंभीर आरोप

---Advertisement---

सोलापूर । सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप शिंगवी यांच्यासह रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार यांच्यावर एका महिलेने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 69 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळची मुंबईची असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला सोलापुरातील एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, त्यानंतर उद्योजक प्रदीप शिंगवी यांनी तिच्यावर अत्याचार केला. याशिवाय संस्थेत काम करणाऱ्या रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार यांनी पीडितेला धार्मिक कारणांवरून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’

दुसरीकडे, उद्योजक प्रदीप शिंगवी यांनीही पीडित महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. शिंगवी यांच्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आले होते. मात्र, ती महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती. कामावर पुन्हा घेण्याची मागणी करत, अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिने एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा शिंगवी यांनी केला आहे.

हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार

या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांनी दोन्ही फिर्यादींच्या आरोपांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोन्ही बाजूंनी मांडलेल्या मुद्द्यांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

या घटनेमुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकजण या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. दोन्ही बाजूंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुढील तपासातून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment