‘दिल है की मानता नही’, महिला दुसऱ्यांदा पळून गेली दीरासोबत; थेट जंगल गाठलं अन्…

---Advertisement---

 

Lalit and Aarti Story : प्रेमात सर्व काही माफ असतं, असं म्हणतात. पण काही प्रेमीयुगुलांच्या अशा काही घटना समोर येतात, की आश्चर्याचा धक्काच बसतो. आता अशीच घटना समोर आली आहे, जिथे एक महिला सलग दुसऱ्यांदा दीरासोबत पळून गेली. दरम्यान, दोघांनी जंगल गाठून जे काही केलं, त्यावरून सध्या गावात एकच चर्चा सुरु आहे.

पोलीस सूत्रानुसार, ललित (दीर) आणि आरती (वहिनी) असे दोघांचे नाव असून, महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. गावात अशी चर्चा आहे की आरती आणि ललित अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही प्रेमीयुगुल १० ऑक्टोबर रोजी घरातून पळून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना परत मिळवून दिले. त्यावेळी आरतीला तिच्या कुटुंबियांनी समजावून सांगितल्यानंतर ती पतीसोबत राहण्यास तयार झाली आणि घरी परतली.

मात्र, काल दोघांनी पुन्हा पळून जाऊन जंगलात विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचून दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून, त्यांनी नेमके कोणते विष सेवन केले हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. दोघेही गावाजवळील जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले. माहिती मिळताच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. दरम्यान, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, मात्र सामाजिक बंधने आणि कौटुंबिक दबावामुळे ते एकत्र राहू शकले नाहीत, अशी चर्चा गावात सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---