---Advertisement---

Tiger attack : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

---Advertisement---

चंद्रपूर: विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील अभयारण्यात वाघांचा वावर असतो, येथील परिसरात वाघांकडून स्थानिक रहिवाशांच्या जीवावर बेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता, पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली असून, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सावली तालुक्यातील निलसनी-पेडगाव परिसरातील जंगलात ही दुर्दैवी घटना घडली.निलसनी पेडगाव गावानजीकच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात रेखा मारोती येरमलवार (५५) ही महिला ठार झाली. ही घटना शनिवार, ३० नोव्हेबर रोजी सकाळी उघडकीस आली. रेखाबाई या झाडणी साठी लागणारं गवत आणण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.

आई घरी पोहचवली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार व राकेश येरमलवार तथा गावकरी यांनी जंगलात रात्री शोध घेतला, पण कुठेही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान शनिवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता वनरक्षक सोनेकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नवनित कातलवार, व गावकरी यांनी जंगलात शोध घेतला असता रेखाचा मृतदेह जंगलात मिळाला.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद घेत वन विभागाने मृत महिलेल्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत दिली. तसेच वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी व नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्हा हा जंगलाच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि मध्य चांदा या चार विभागांत विभागलेला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाघांची संख्या, त्यांना कमी पडत असलेला अधिवास आणि जंगलात होणारे अतिक्रमण यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील चार वर्षांत तब्बल 98 वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यू झाला तर वन्यजीवांच्या हल्ल्यात आतापर्यंत 145 जणांना जीव गमवावा लागला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment