Bareilly Crime News : बरेलीतील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरातील घुरसमसपूर गावात एका महिलेने तिच्या शेजाऱ्याची हत्या केली. या धक्कादायक घटनेच्या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने पोलिसांना गोंधळात टाकले आहे.
महिलेने सुरुवातीला तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर मध्यरात्री शेजाऱ्याच्या घरी जाऊन त्याची हत्या केली. मृतकाचे नाव इक्बाल असून त्याच्या पत्नी शहनाजने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीची हत्या शेजारचे इद्रिश आणि त्याची पत्नी रबिना यांनी केली आहे.
हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!
चौकशी दरम्यान रबिनाने पोलिसांना सांगितले की, इक्बाल त्याच्या कामाच्या बहाण्याने तिच्या घरात वारंवार येत असे. त्यादरम्यान दोघांमध्ये फोनवरून संपर्क सुरू झाला.
इक्बालने तिला कपडे दाखवण्याच्या बहाण्याने घरात बोलावले आणि नंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. रबिना म्हणाली की, इक्बालने तिला ब्लॅकमेल करून शोषण केले, त्यामुळे ती त्रस्त होती.
29 जानेवारी रोजी रबिनाने तिच्या पती इद्रिशला चहामध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या. इद्रिश गाढ झोपल्यानंतर रबिनाने रात्री 11.40 च्या सुमारास, इक्बालला घरात बोलावले.
दोघेही भिंतीजवळ बसले, त्यावेळी इक्बालने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. संधी साधून रबिनाने दोन्ही हात मानेवर ठेवले आणि अचानक ताकदीने दाबले, ज्यामुळे इक्बाल मरण पावला.
हेही वाचा : व्याजाच्या बदल्यात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; व्यावसायिकाने संपवले जीवन
इक्बालचा मृतदेह पायऱ्यांवर ठेवून रबिना शांतपणे घरात परतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला असता, रबिनाने हा गुन्हा कबूल केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि मृत्यूस कारणीभूत ठरलेले रबिनाचे वक्तव्य पोलिसांना मोठे धक्के देणारे होते. ही खळबळजनक घटना बरेलीतील अनेक कुटुंबांसाठी धक्का देणारी ठरली असून, पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.