---Advertisement---

धक्कादायक ! राज्यात महिलांवरील अत्याचार थांबेना, महिलेला दोन महिन्यांपासून ठेवले साखळ दंडाने बांधून

---Advertisement---

कोल्हापूर : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. कोल्हापूर जिल्हयातील राजारामपुरी येथे एका ४० वर्षीय महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित महिलेची साखळ दंडातून सुटका केली आहे. मात्र, हा प्रकार कुणी आणि कशासाठी केला ? हे अद्याप कळू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका साळी (४०) असे महिलेचे नाव असून, ती तिच्या भावासोबत वास्तव्याला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिला गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून साखळ दंडात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेची साखळ दंडातून सुटका केली आहे. मात्र, हा प्रकार कुणी आणि कशासाठी केला ? हे अद्याप कळू शकलेले नाही.

दरम्यान, सदर महिला मानसिक ग्रस्त असून काही वस्तू उचलून घेते किंवा काहीही खाण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्यासोबत असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण

जळगाव : व्याजाच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजता घडली. या घटनेत संशयित आरोपींनी व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने मारहाण केली आणि जिवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश अशोक मराठे (वय ४४, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) या व्यापाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सागर सपके याने व्याजाने दिलेले पैसे परत मागितले. महेश मराठे यांनी ‘मी तुमचे सर्व पैसे परत केले आहेत,’ असे सांगितले. पण हे ऐकून सागर सपके आणि राधेश्याम शर्मा यांचा राग अनावर झाला.

त्यांनी महेश मराठे यांना चक्क बुलेटवरून सागर सपके याच्या कोंबडी बाजार येथील राहत्या घरासमोर नेले. तिथे महेश मराठे यांच्या पाठीवर, दोन्ही हातांवर, दोन्ही पायांच्या मांडीवर बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दोघांनी मराठे याला पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर महेश मराठे यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत सागर सपके व राधेश्याम शर्मा या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment