---Advertisement---
चोपडा : तालुक्यातील एका गावातील महिलेला गवताचा भारा उचलून देण्याच्या बहाण्याने शारीरिक छेड काढीत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ रोजी दुपारी १ ते १:३० च्या दरम्यान घडली.
बांधावरून गवत कापणाऱ्या दोघा महिलांनी गवताचा भारा बांधला एकीने दुसरीच्या डोक्यावर भारा चढविला. मात्र दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर गवताचा भारा उचलण्यासाठी केळीची पिलपत्ती करणारा राजू सखाराम भिल यास बोलावले असता त्याने भारा उचलून झाल्यावर महिलेची छेड काढीत विनयभंग केला.
त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीकांत गांगुर्डे हे करीत आहेत.