---Advertisement---

धक्कादायक ! घरी सोडतो सांगून बसविले अन् जंगलात नेऊन केला सामूहिक अत्याचार, भुसावळात गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात एक दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारातून त्या गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशातच पुन्हा एका ३५ वर्षीय महिलेला ‘घरी सोडतो’, असे सांगून तिघांनी जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली, तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.

भुसावळ तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिला ही आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास खेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवरून जवळच जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात एक दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारातून त्या गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशातच पुन्हा एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---