---Advertisement---

Bhusawal Crime : मुलाच्या मित्रानेच न्यूड कॉलसाठी भाग पाडले अन् उकळली १० लाखांची खंडणी

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : मुलाच्या मित्रानेच एका ४० वर्षीय महिलेला जीवे मारण्याची धमकी देत न्यूड व्हिडिओ कॉलसाठी भाग पाडले. त्याची रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत आठ ते दहा लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

पोलीस सूत्रानुसार, तक्रारदार महिलेला डिसेंबर २०२४ मध्ये संशयिताकडून पैसे मागणीचे कॉल सुरू झाले. त्याने सुरुवातीला ५० हजार रुपये ऑनलाईन घेतले. त्यानंतर धमकीचे सत्र सुरूच राहिले.

महिलेला व्हिडिओ कॉलवर लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडले. हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी एकूण ८ ते १० लाख रुपये उकळण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पीडित महिलेच्या मुलालाही धमकावून, मारहाण करत संबंधित व्हिडिओ दाखवण्यात आला. महिलेने आरोपीच्या वडिलांकडे तक्रार केली असता, त्यांनीही महिलेला आणि तिच्या मुलांना धमकी दिली.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणी, धमकी, विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment