---Advertisement---
जळगाव : जिह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून होणार्या छळाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आत्महत्या केली आहे. माधुरी विशाल सोनवणे (पाटील) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील नंदनवन सिटी येथे ही घटना घडली आहे. माधुरी पाटील-विशाल सोनवणे यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने माधुरी ही मेडिकल स्टोअरवर नौकरी करुन संसाराचा गाडा ओढण्यास विशालला करत होती. मात्र, विशाल हा माधुरीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करत असे.
अखेर या छळाला कंटाळून माधुरी हीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी माधुरीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
महिलेचा विनयभंग करत पती व सासऱ्याला मारहाण
अमळनेर : खड्डा खोदण्यावरून भांडण झाल्याने महिलेचा विनयभंग करून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे सासरे सोसायटीचे डायरेक्टर असून २ रोजी सोसायटीच्या जागेच्या बाजूला खड्डे खोदणाऱ्या देवराम बाबुराव कोळी, सागर देवराम कोळी, अशोक बाबुराव कोळी यांना मज्जाव केला असता त्यांनी महिलेच्या सासऱ्याला शिवीगाळ व मारहाण केली. गावातील लोकांनी ते भांडण मिटविले. त्याच रात्री गावात तमाशाचा कार्यक्रम असल्याने महिलेचे पती तमाशा पाहायला गेले होते.
रात्री ९:३० वाजता महिला घरी एकटी असताना सागर देवराम कोळी हा घरात घुसून आला. महिलेने घाबरून आरडाओरड केल्याने तिची सासू घरात आल्याने सागर कोळी पळून गेला. त्यानंतर पती जाब विचारण्यासाठी सागर कोळीकडे गेले असता देवराम कोळी, सागर कोळी, अशोक कोळी यांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.