---Advertisement---
Malkapur News : असं म्हणतात की नियतीच्या मनात काय असेल, हे कुणीही ओळखू शकत नाही. असच एका आई आणि लेकीसोबत घडलं आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंदिरात जायचे असल्याने त्या नदीत पाय धुण्यासाठी उतरल्या, मात्र दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना निंबोला देवी येथे घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम मयूर जामोडे (३२) आणि मुलगी आरोही मयूर जामोडे ( ५) मयत आई-लेकीचे नाव आहे. खामगाव येथील ६ महिला व २ पुरुष बुलढाणाच्या नांदुरा ग्रामीण येथील निंबोला देवी येथे पूजा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, मंदिराशेजारी असलेल्या विश्वगंगा नदीकाठी पाय धुण्यासाठी गेले. त्यातील पूनम मयूर जामोडे (३२) आणि मुलगी आरोही मयूर जामोडे (५) या माय-लेकीला पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर तीन महिलाही त्याच पाण्यात बुडाला, परंतु त्यांना वाचवण्यात आले.
बाहेर काढलेल्या महिलांना पुढील उपचारांसाठी मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मयत आई आणि लेकीचा मृयदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
कसा घडला अपघात ?
मिळालेल्या माहितीनुसार, सुतळपुरा परिसरातील किल्ल्याजवळ वास्तव्यास असलेले मयूर जामोडे हे पत्नी पूनम मयूर जामोडे ( ३२) आणि मुलगी आर्वी जामोडे (५ ) यांच्यासोबत निंबा देवीच्या दर्शनासाठी मलकापूरला आले होते. दरम्यान, पूनम जामोडे आणि मुलगी आर्वी विश्वगंगा नदीकाठाजवळ पाय धुण्यासाठी गेले असता, आर्वीचा पाय खोल पाण्यात गेला आणि ती बुडाली. मुलीला वाचवण्यासाठी आई पूनमनेही पाण्यात उडी मारली. यावेळी तिचे वडील मयूर जामोदे आणि नदीकाठावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला.