Viral Video : रस्त्यावरील सिग्नल असो वा रेल्वे क्रॉसिंग, अनेकजण हे नियम धाब्यावर बसवून जीवघेणा धोका पत्करतात. वेळ वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅक पार करणाऱ्यांना कित्येकदा मोठा फटका बसतो. असाच एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जिथे एका महिलेने रेल्वे क्रॉसिंग ओलांडले आणि अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने ती अपघातातून बचावली. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक रेल्वे स्टेशन परिसर दिसत आहे. काही अंतरावरून एक ट्रेन वेगाने येत असताना अनेक जण जीवाची पर्वा न करता रुळ ओलांडताना दिसतात. यात एक महिला देखील आहे, जी ट्रेन अगदी जवळ असतानाही ट्रॅक पार करण्याचा धोका पत्करते. काही क्षणांचा विलंब झाला असता, तर मोठा अपघात घडला असता. मात्र सुदैवाने ती ट्रेनच्या धडकेपासून थोडक्यात बचावली.
Viral News : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!
सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘arup.bhattacharjee.731’ या अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून, तो प्रचंड व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा थरारक क्षण पाहिला असून, अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CjxCML0qxCJ/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
हा व्हिडिओ पाहून अनेकजण स्तब्ध झाले असून, काहींनी महिलेला जबाबदार ठरवले आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, “पागल आहे का?”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “देवा, काय हे!”. अशा प्रकारे अनेकांनी संतापजनक आणि धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टीप: महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही. केवळ माहिती म्हणून ही बाब वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. कुठल्याही प्रकारे अशा कृतीचे समर्थन आम्ही करत नाही.