---Advertisement---
विक्की जाधव
अमळनेर : सरकारच्या स्वयंपाक भांडे वाटप योजनेत होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांध्ये नाराजी आहे. अनेक ठिकाणी अर्ज करूनही अद्याप भांडी मिळालेली नाहीत, अशी तक्रार नागरिकांची आहे. दरम्यान, अमळनेर शहरातील असंख्य महिलांमध्ये बुधवारी (१६ जुलै) संताप उफाळून आला. यावेळी हातात आधार कार्ड व अर्ज घेऊन आलेल्या महिलांनी थेट आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाजवळ मोर्चा नेला.
महिलांनी शहरातील बहुगुणे हॉस्पिटल जवळून जाणारा मुख्य रस्ता आडवत ठिय्या आंदोलन सुरू केले. रस्त्यावर ठिय्या देत महिलांनी “हक्काचं भांडे दया नाहीतर खुर्ची खाली करा”, योजना फसव्या नाही पाहिजे” अशा विविध घोषणा दिल्या. सकाळपासून वाढत गेलेल्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक ठप्प झाल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.
मचा हक्क मागतोय
“आम्ही कोणतीही भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय!” असे उद्गगार काढत महिलांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले. शिवाय योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.