---Advertisement---

Dhule News : ६८ ग्रामपंचायतींमध्ये येणार ‘महिला राज’

---Advertisement---

धुळे : साक्री तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदांचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात दुपारी ३ वाजता झालेल्या सभेत काढण्यात आली. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३ पदे आरक्षित असून, त्यापैकी २ पदे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

यात लोणखेडी आणि कळंबीर ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिलांसाठी तर वसमार ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली. अनुसूचित जमाती प्रवर्गात १२ पदे आरक्षित असून, त्यापैकी ६ पदे अनुसूचित जमाती महिलांसाठी आहेत.

आष्टाणे, कोकले, आयणे/मळखेडे, म्हसदी प्र. नेर, नागपूर (व), आणि अक्कलपाडा या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी तर अनुसूचित जमाती महिलांसाठी मलांजन, निळगव्हाण, नाडसे, शेणपूर, विटाई आणि बळसाणे या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या.

साक्री तालुक्यातील असे आरक्षण

नागरिकांचा मागास प्रवर्ग पदासाठी १८ पदे आरक्षित असून, त्यापैकी ९ पदे नागरिक मागास प्रवर्ग महिलांसाठी आहेत. त्यात भडगाव (व), तामसवाडी, धाडणे, फोफादे, अंबापूर, बेहेड, सैयदनगर/इच्छापूर, नांदवन आणि काळगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गात एकूण ३५ पदे आरक्षित असून, त्यापैकी १७ पदे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यात उंभर्टी, फोफरे, इंदवे, उंभरे, भामेर, भागापूर, सातरपाडा, दिघावे, कावठे, हट्टी खु., वेहेरगाव/रोजगाव, महिर, शेवाळी मा., उभरांडी/होडदाणे, खुडाणे, दारखेल आणि सतमाने या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या.

या आरक्षण सोडतप्रसंगी धुळे उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार साहेबराव सोनवणे, निवासी नायब तहसीलदार तसेच साक्री तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---