मुंबई : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे तर दुसऱ्या बाजुला या मुद्द्यावरून नेतेमंडळी एकमेकांना टोला लगावत आहेत. दरम्यान भाजप सरकारनं महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत सादर केल्यानंतर महिलांकडून सरकारचं कौतुक केलं जातंय.
याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. महिला खरोखर स्वातंत्रपणे कारभार बघतात का? अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. भारतीय राजकारणात महिला नेतृत्वांना जागा मिळाली नव्हती, असं म्हणत केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मांडून ते पारित करून घेतलं आहे. राज्यसभेत ते आता चर्चेला येईल मात्र, इतर क्षेत्रांप्रमाणे राजकारणात देखील पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रभाव दिसून येत आहे.
महिला आरक्षणाबाबत बच्चू कडूंनी केलेल्या विधानाबाबत फडणवीस म्हणाले की, जेव्हा महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण दिलं गेलं, तेव्हा देखील लोक अश्याच पद्धतीने बोलत होते. आरक्षण नसताना देखील ८१ टक्के महिला लोकसभेत आहेत आणि त्यामध्ये आणखी १०० महिलांची भर पडणार आहे; त्यामुळे बच्चू कडूंच्या विधानाशी सहमत नाही.