तरुण भारत लाईव्ह । ३० जानेवारी २०२३। दक्षिण आफ्रिकेच्या पोशेफस्ट्रूम शहरातील सेनवेजपार्क्स मैदानावर भारतीय महिलांनी इतिहास घडवत प्रथमच आयसीसी अंडर- १९ महिला टी- २० विश्वचषक २०२३ जिंकला. भारताने इंग्लंडला सात विकेट्स राखून पराभूत केले आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले.
रविवारी टीम इंडियाचा अंतिम सामना इंगलंडच्या संघाविरुद्ध होता. पण प्रथम फलंदाजी करताना इंगलंडचा संघ केवळ फलंदाजी करताना इंगलंडचा संघ केवळ ६८ धावतच गारद झाला. प्रत्युत्तरात सौम्या तिवारीच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारतीय मुलींनी केलेल्या प्रचंड पराक्रमामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली असून देशभरात युवक- युवतींनी रस्त्यावर उतरून, पेढे मिठाई वाटून आनंद साजरा केला. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
बीसीसीआयकडून पाच कोटींची घोषणा
भारतीय महिलांनी पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयमचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले आणि संघाला ५ कोटींच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा केली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी- २० विश्वचषक जिंकला होता आणि शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील मुलींनी तसाच पराक्रम केला.