World Cup 2023 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच; पहा व्हिडिओ

पुढील महिन्यापासून मायदेशात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी आदिदास (Adidas) ने टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तार यांनी गायलेल्या ‘३ का ड्रीम’ या गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली. ‘ड्रिम ऑफ ३’ हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे जे भारतीय संघाला १९८३ आणि २०११ नंतर तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. टीम इंडियाचे अधिकृत किट प्रायोजक आदिदासने बुधवारी (२० सप्टेंबर) एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासोबत अनुभवी फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराजसह अनेक खेळाडू दिसले. ५ ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आदिदासने जर्सीमध्ये बदल काही केले आहेत. खांद्यावरच्या तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी त्यांनी तिरंग्याच्या तीन रंगांचा समावेश केला आहे. छातीच्या डाव्या बाजूला बीसीसीआयच्या लोगोवर आता दोन स्टार आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे. ते दोन स्टार म्हणजे १९८३ आणि २०११चा विश्वचषक विजयाची खुण आहे.