जागतिक आरोग्य दिन; वाचा महत्त्व आणि इतिहास

तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी ७ एप्रिल रोजी आपल्या स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करते. १९५० मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने आपला वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे त्याच्या स्थापनेचा वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने १९९१ पासून एका थीमनुसार तो साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कोणत्या ना कोणत्या थीमनुसार साजरा केला जातो. यावर्षी साजरा होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनासाठी सर्वांसाठी आरोग्य  ही थीम ठेवण्यात आली आहे.