World Tribal Day : विश्व आदिवासी दिवस का साजरा केला जातो ?

World Tribal Day : केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आज ९ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जात आहे. परंतु, हा दिवस का साजरा केला जातो. हे तुम्हाला माहितेय का ? चला तर मग या संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

जगभरात आदिवासींची उपजीविका, मानवाधिकार, संस्कृती सुरक्षितता आणि जागरुकता वाढीसाठी दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात.

आदिवासींनी आपली ओळख भाषा, संस्कृती, परंपरागत अन्नधान्य सुरक्षा व स्वशासन प्रस्थापित करण्यासाठी, आदिवासींचे अस्तित्व स्वाभिमान अबाधित व दृढ करण्याचाही हा दिवस आहे.

अर्थातच ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावरील आदिवासींसाठी नव्याने घडवून क्रांती आणण्यासाठीचा नवा पर्व आहे. भारतात संविधानानुसार अनुसूचित जमाती ही आदिवासी जमात आहे.

आदिवासींनी ओळख प्रस्थापित करण्यासाठी जागरूक होणे, संघर्ष करणे आवश्यक आहे. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत निर्णय घेऊन ठरविण्यात आला असल्याने या ९ ऑगस्ट या दिवसाला भारत देशाने स्वतःहून सन्मानित केले पाहिजे.