जागतिक क्षयरोग दिन विशेष; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉर्क यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला आणि त्यांचा प्रबंध शास्त्रन्यांच्या परिषदेत मांडला व त्यास २४ मार्च रोजी मान्यता मिळाली म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. आता क्षयरोग कशामुळे होऊ शकतो आणि क्षयरोग झाल्यावर काय काळजी घेतली पाहिजे तसेच किती महिने उपचार घ्यावे लागतात हे सविस्तर जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

क्षय रोग हा एक जिवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे.

ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो.

कमी होणारे वजन, थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, रात्री येणारा घाम, भूक न लागणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत

उपचार 
सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती, औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात. जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.

क्षयरोग झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी
खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.
खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.
रग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी
लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे
घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.

आजार टाळण्यासाठीची काळजी
समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.