WTC Final AUS vs SA : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कगिसो रबाडाने ऑस्ट्रेलियाला एकामागे एक दोन मोठे धक्के दिले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन प्रयोग करून मैदानात उतरला होता, पण, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज रबाडासमोर त्यांचे दोन्ही प्रयोग अपयशी ठरवले आहे.
रबाडाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील दोन्ही प्रयोग एकाच षटकात उध्वस्त केले. ऑस्ट्रेलियाने केलेल्या दोन प्रयोगांपैकी एक सलामीच्या क्रमाने होता तर दुसरा तिसऱ्या क्रमांकावर होता. पण, पॅट कमिन्सच्या या दोन्ही प्रयोगांसाठी रबाडाचा फक्त एक षटक पुरेसा होता.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ७ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या रबाडाने सर्वप्रथम सलामी जोडीचा प्रयोग अयशस्वी केला. त्यानंतर फक्त २ चेंडूत त्याने तिसऱ्या क्रमांकावर केलेला प्रयोगही उधळून लावला.
ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या नवीन सलामी जोडीसह मैदानात उतरला. त्याच वेळी, त्याने कॅमेरॉन ग्रीनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयोग केला.