तरुण भारत लाईव्ह । ११ एप्रिल २०२३। भारतीय ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, ग्रह ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध मेष राशीत प्रवेश करत आहे. 7 जूनपर्यंत बुध मेष राशीत प्रवेश करेल. त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. या तीन राशींमध्ये धनलाभ आणि भाग्याचे योग तयार होत आहेत. या तीन राशी कोणत्या आहेत हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
बुध तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी असून तो लग्न घरामध्ये स्थित आहे. तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. याशिवाय तुमचा पराक्रम आणि धैर्यही वाढेल. अविवाहितांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. या काळात त्यांचे लग्न होऊ शकते. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल आणि परिस्थितीदेखील पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
धनु रास
मेष राशीमध्ये बुधाची उपस्थिती धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. जे ज्योतिषी, अध्यात्मवादी, विचारवंत आणि कथाकार आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे. तुमच्या जीवनात आनंद असेल आणि घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या तुमच्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल.
मकर रास
बुध ग्रह 7 जूनपर्यंत तुमच्या चौथ्या भावात भ्रमण करेल. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहन देखील खरेदी करू शकता. आईची साथ मिळेल. तुम्ही रिअल इस्टेट, खाद्यपदार्थ, रेस्टॉरंट, हॉटेल व्यावसायात काम करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.