नंदुरबार : धडगाव तालुक्यातील हरणखुरी येथील ‘याहामोगी माता बियाणे संवर्धन समिती’ला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क (GSFR) या पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार वर्ष 2020-21 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.
12 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील 59 देशांमधून शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यक्ती सहभागी होतील. या सत्रादरम्यान स्थानिक आणि स्थानिक समुदाय आणि जगातील सर्व प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना पुरस्कृत कसे करावे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातील.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी, कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा , वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहापात्रा, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक () आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेले, ङ्गप्लांट अथॉरिटी भवनफ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालय, आणि ऑनलाइन वनस्पती विविधता ङ्गनोंदणी पोर्टलफचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.