10वी उत्तीर्ण आहात का? भारत सरकारच्या कंपनीत ३८८३ जागांवर भरती, असा करा अर्ज..

#image_title

सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आलीय. तब्बल ३८८३ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवात देखील झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

ही भरती अप्रेंटिस पदासाठी जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास आणि आयटीआय पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी आयटीआय पास तरुणांसाठी २४९८ जागा रिक्त आहेत तर इतर पदांसाठी १३८५ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत NCVT किंवा SCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी. तसेच आयआयटी नसलेल्या पदांसाठी १० वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला yatra india limited recruit-gov.com या साइटवर जावे लागेल. त्यानंतर लॉग इन करा. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरुन सबमिट करा. या फॉर्मची एक प्रिंट आउट स्वतः जवळ ठेवा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पात्रतेनुसार केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट करुन गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ६००० ते ७००० रुपये वेतन दिले जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक कर