Yaval : यावल : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगेत वसलेल्या आणि जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या आसराबारी या आदिवासी पाड्यांवर प्रजासत्ताकाच्या ७४ वर्षानंतर पहिल्यांदा क्रांतीवीर बिरसा मुंडा स्कूल च्या माध्यमातून नॉलेज सेंटर स्पर्धा परीक्षा केंद् संचालिका चंपा भारद्वाज यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
आदिवासी मुले शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शिक्षण देण्याच्या हेतूने भुसावळ येथील डॉ. दिगांबर खोब्रागडे आणि वंशिका खोब्रागडे हे दाम्पत्याने शाळा स्व: खर्चातून चालवित आहेत. यावेळी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देऊन, ध्वजारोहण का केले जाते. भारतीय संविधानात आदिवासींना कोण कोणते अधिकार आहेत याचेही महत्व आदिवासी बांधवांना सांगितले.
यावेळी कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिगंबर खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल, रामलाल रातु बारेला, मळू बारेला, देविदास ढेमसिंग बारेला, भलजी राम बारेला, मुकेश लाव्हक बारेला, वारसिंग सुरसिंग बारेला, बुधला बारेला, धनसिंग सखाराम बारेला, दिनेश मडू बारेला, नवलसिंग भिका बारेका, बिराज रेदा बारेला, जुगा गुरुणी बारेला, दिलीप रामलाल बारेला, किरण वारसींग बारेला, जुवानसिंग प्रेमसिंग बारेला, गुडया महाऊ बारेला, सुहाबी देवीदास बारेला, रुनी मळू बारेला, मिराबाई रामलाल बारेला, रेवषीबाई जुगा बारेला, शीतल मडू बारेला , आदिवासी ग्रामस्थ आणि लहान मुले उपस्थित होते. आपल्या वस्तीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाल्यामुळे आदिवासीनी आनंद व्यक्त केला.