यावल : यावल बस स्थानकात चोरटयांनी गेल्या दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. अशातच आज पुन्हा एका प्रवाशी महिलेच्या पर्समधून ३० हजार रुपये किमतीची घड्याळ आणि पैसे, तर एकाच्या खुशातून तीच हजार रुपये चोरून नेल्याने एकच गोंधळ उडाला.
यावल बस स्थानकावर आज ९ जुलै रोजी सकाळी ११ ते ११ .१५ वाजेच्या दरम्यान चालक आर.पी. मोरे व वाहक अरूण तडवी यांनी बस (क्र. एम.एच २० बि.एल १४०३ ) यावल ते रावेर प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी लावली. यातील प्रवाशी आशालता लक्ष्मण निमगडे (रा. अडावद ता. चोपडा) व राजेन्द्र किसन जाधव (रा. यावल) बसमध्ये बसले होते.
दरम्यान, बसमध्ये अज्ञात चोरटयांनी आशालता निमगडे यांच्या पर्समधुन सुमारे ३० हजार रूपये किमतीची महागडी घडयाळ व काही पैसे तसेच राजेन्द्र जाधव यांच्या खिशातुन तीन हजार रूपये चोरून नेले.
वाहक व चालक यांनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रवाशांची चौकशी करावी अशी मागणी केली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोहन तायडे, वसीम तडवी व नरेन्द्र बागुले यांनी व एस टी आगारातील यांनी महिलांची तपासणी केली. एसटी बसच्या सर्व प्रवाशांची चौकशी केली मात्र काही मिळुन आले नाही.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी केलेल्या कृत्यामुळे प्रवाशांचे दोन तास निकामी गेले व त्यांना त्रास सहन करावा लागला. चौकशी पुर्ण झाल्यावर ही एसटी बस आपल्या मार्गावर मार्गस्थ झाली. याबाबत ज्या प्रवाशांची चोरी झाली आहे ते तक्रार देण्यासाठी यावल पोलीस ठाण्यात गेले आहे.
दरम्यान, यावलचे बसस्थानक हे चोरट्यांचे माहेर घर बनले असून, या आदी या बस स्थानकावरून अनेकांचे मंगळसुत्र, सोन्याचे दागीने, मोबाईल व पैसे चोरीस गेले आहे. या ठिकाणी बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी यावलचे आगार प्रमुखांसह अनेक प्रवाशांकडून करण्यात येत आहे.