---Advertisement---

सातपुडा वनक्षेत्रात परप्रांतीय शिकार करायला आले, पण यावल वनविभागाने उधळला डाव

---Advertisement---

यावल : सातपुडा वनक्षेत्रात शिकार करण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांचा डाव यावल वनविभागाने उधळला आहे. या कारवाईत दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या मात्र, शिकारी जंगलाचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागात रेंज पथक वैजापूरसह वैजापूर वन क्षेत्रातील परिमंडळ वैजापूरमधील कक्ष क्रमांक २२६ २२५ , २२३ व २३२ या भागात गस्त करीत असताना, कक्ष क्रमांक २३२ मधील जंगल भागात गावठी बंदुकीने फायर झाल्याचा आवाज आला. वन विभागाच्या पथकाने सहकर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने गेले असता काही अज्ञात इसमांकडे गावठी बंदुके दिसून आले.

अज्ञात इसम यांचा पाठलाग केला असता पथकाची चाहूल लागताच इसम यांनी त्यांच्या कडील कक्ष क्रमांक२३२ या भागात लपवलेल्या दोन दुचाकी सोडून जंगलात दऱ्या खोऱ्यांचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले. अज्ञात इसम हे परप्रांतीय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

धुळे प्रादेशिक वनसंरक्षक नीनु सोमराज, यावल वनविभाग उपवनसंरक्षक जमीर शेख, चोपडा सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे, समाधान पाटील, सहाय्यक वन संरक्षक यावल,वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर विकेश ठाकरे यांच्या नेतृत्वात वैजापूर वनपाल आय एस तडवी , संदीप भोई, चूनिलाल कोळी, बाजीराव बारेला, भारसिंग बारेला, संदीप ठाकरे, निखिल माळी, हर्षल पावरा, गणेश बारेला, विजय शिरसाठ यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, वनक्षेत्रास लागून कोणत्याही प्रकारे वन वनवा, अवैध वृक्षतोड, अवैध लाकुड वाहतूक, अतिक्रमण, अवैध शिकार व वन्यजीव तस्करी अश्या प्रकारचा गुन्हा निदर्शनास आल्यास महाराष्ट्र वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक१९२६ वर संपर्क करावा, असे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment